अकोला: अकोला शहरासाठी काटेपूर्णा प्रकल्पातून 24.03 दलघमी पाणी आरक्षित
Akola, Akola | Nov 12, 2025 अकोला : जिल्ह्यातील विविध प्रकल्पांतून बिगर सिंचनअंतर्गत पाणीपुरवठा योजनांसाठी 90.34 दलघमी पाणी आरक्षणास जिल्हास्तरीय आकस्मिक पिण्याचे पाणी निश्चिती समितीकडून मंजुरी देण्यात आली. अकोला शहरासाठी काटेपूर्णा प्रकल्पातून 24.03 दलघमी पाणी, मूर्तिजापूर शहरासाठी 3.35 दलघमी तसेच अन्य योजना व संस्थांसाठी ठराविक प्रमाणात पाणी आरक्षित करण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ. वर्षा मीना यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 12 नोव्हेंबर रोजी दुपारी 4 वाजता झालेल्या बैठकीत आरक्षित पाण्याची रक्कम तातडीने जलसंपदा विभागा