टूर्स अँड ट्रॅव्हल्स व्यावसायातून सुरू असलेल्या वादातून पुण्यातील एका व्यावसायिकाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जाकीर गणी मुजावर (वय ४५) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दत्तात्रय मोरे (वय ५०) याच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.