वारकरी संप्रदाय संपवण्याचे षडयंत्र, भाजप प्रवक्ते राम कुलकर्णी यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप
महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय संपवण्याचे षडयंत्र काँग्रेसने हाती घेतले आहे, असा आरोप आज मंगळवारी सकाळी ११ च्या सुमारास भाजपचे प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केला आहे. नगर जिल्ह्यातील घुलेवाडी येथे हभप संग्राम महाराज भंडारे यांच्या कीर्तनादरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांनी जीवघेणा हल्ला केला. हा हल्ला नेते बाळासाहेब थोरात यांच्या सांगण्यावरूनच झाला असून, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनीच वारकरी चळवळ संपवण्यासाठी कार्यकर्त्यांना सूचना दिल्याचा संशय कुलकर्णी यांनी व्यक्त केला.