जळगाव: कुंभारखेडा येथे भरधाव बसने दुचाकीला उडविले: दहावीचा विद्यार्थी ठार, दुसरा गंभीर, शासकीय रुग्णालयात नातेवाईकांची गर्दी
दहावीच्या शिकवणीला जात असलेल्या दोन शालेय विद्यार्थ्यांच्या दुचाकीला समोरून येणाऱ्या बसने जोरदार धडक दिल्याची हृदयद्रावक घटना सोमवारी २४ नोव्हेंबर रोजी पहाटे ५.३० वाजता चोपडा तालुक्यातील अकुलखेडा गावाजवळ घडली आहे. या भीषण अपघातात जय प्रदीप महाजन (वय १५, रा. अकुलखेडा) या विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर त्याचा मित्र नील हर्षल पाटील गंभीर जखमी झाला आहे.