थेऊर कोलवडी रस्त्यावर ट्रकने 9 दुचाकींना धडक दिल्याची घटना घडली आहे. ही घटना थेऊर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील स्मशानभूमीजवळ बुधवारी (ता. 26) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही परंतु, 9 दुचाकींचा चक्काचूर झाला आहे. लोणी काळभोर पोलीस ठाण्यात ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.