भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथील नगरपालिका निवडणुकीत हाय व्होल्टेज राजकीय नाट्य पाहायला मिळत आहे. तुमसर येथे माजी खासदार आणि तीन वेळा आमदार राहिलेल्या भाजपचे मधुकर कुकडे यांच्या पुतण्याला, आशिष कुकडे यांना भाजपने ऐनवेळी डावलून प्रदीप पडोळे यांना उमेदवारी दिली. या निर्णयामुळे संतापलेल्या मधुकर कुकडे यांनी भाजपवर थेट आरोप केला आहे. पुतण्या आशिष कुकडे यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असून, माजी खासदार मधुकर कुकडे यांनी त्यांच्या या बंडखोरीला उघडपणे समर्थन दिले आहे.