कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील आत्मा मालिक संकुलात ६९ व्या राष्ट्रीय शालेय १७ वर्षाखालील मुलींच्या कबड्डी स्पर्धेचे २५ डिसेंबरपासून आयोजन करण्यात आले असल्याची माहिती शालेय व क्रीडा व्यवस्थापक सुधाकर मलिक यांनी दिली. जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन संपन्न होणार आहे.