आरोग्य व कुटूंब कल्याण प्रशिक्षण केंद्र नागपूर यांच्यावतीने यात्री निवास सेवाग्राम येथे एक दिवसीय किशोर-किशोरी या विषयावर विभागीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.कार्यशाळेत किशोर व किशोरींना होणा-या शारिरिक, मानसिक व सामाजिक बदलांबाबत सविस्तर व योग्य मार्गदर्शन करण्यात आले तसेच आरोग्य, पोषण, वैयक्तिक स्वच्छता, मानसिक आरोग्य, लैगिंक व प्रजनन आरोग्य, आत्मविश्वास वृध्दी, निर्णयक्षमता व जीवन कौशल्य या महत्वाच्या विषयावर संवादात्मक पध्दतीने माहिती देण्यात आली.कार्यशाळेदरम्यान विद्यार्थ्य