15 ऑक्टोबरला रात्री 7 वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांच्या अध्यक्षतेखाली सिव्हिल लाईन येथे परिमंडळ क्रमांक दोन अंतर्गत मुद्देमाल हस्तांतरण व आदर्श गणेश मंडळ सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दहा वाहन, सहा दागिने आणि 176 मोबाईलची हस्तांतरण यावेळी करण्यात आले. दिवाळीच्या आधी आपला मुद्देमाल परत मिळाल्यामुळे यावेळी नागरिकांच्या चेहऱ्यावर एक हसू पाहायला मिळाले. त्यांनी पोलिसांचे आभार देखील मानले.