भोकरदन: शहरात पहिल्याच पावसात नागरी वस्तीत पाणी, स्थानिकांचे महात्मा फुले चौकात गड्ड्यात बसून आंदोलन
आज दिनांक 23 जून 2026 वार मंगळवार रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास भोकरदन शहरातील महात्मा फुले चौक माढा कॉलनी परिसरात पडलेल्या गड्यांमध्ये पाण्यात बसून स्थानिकांनी हे आंदोलन करत नगरपरिषद भोकरदन वर नाराजी व्यक्त केली आहे. कारण काल 22 जून रोजी रात्री झालेल्या पावसामुळे म्हाडा कॉलनी परिसरात असलेल्या नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ झाली होती, यामुळे या पाण्याचा योग्य निचरा व्हावा यासाठी नगर परिषदेच्या विरोधात स्थानिक नागरिकांनी हा रोष व्यक्त केला आहे.