खंडाळा: धरण क्षेत्रात सुरु असलेल्या पावसामुळे वीर धरणातून नीरा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू, नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
गेल्या दोन दिवसांत निरा खोऱ्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस पडत असल्याने सातारा व पुणे जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या वीर धरण पुन्हा ओव्हरफ्लो झाल्याने नदी पात्रात सोमवारी रात्री ८ वाजून २० मिनिटांनी निरा नदी पात्रामध्ये काहीकाळ २३ हजार ३३५ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला असून प्रशासनाने नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय. पावसाचे प्रमाण व तीव्रता लक्षात घेता विसर्गामध्ये बदल करण्यात येईल असे सांगण्यात आले.