नागपूर ग्रामीण: धक्कादायक: पत्नी प्रियकरासोबत पळून गेल्याने तणावात असलेल्या ३४ वर्षीय तरुणाची जीवनयात्रा संपली
वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पत्नीच्या छळाला कंटाळून ३४ वर्षीय पतीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मनीष देवानंद देशभ्रतार असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी मनीषची आई कविता देशभ्रतार यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी मृत मनीषची पत्नी पूजा देशभ्रतार हिच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.मनीष आणि पूजा यांचा १२ वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता व त्यांना दोन मुले आहेत.