गडचिरोली: नक्षल समर्थकाला गडचिरोली पोलिसांकडून अटक... भामरागडमध्ये घातपाताची रेकी उधळली
गडचिरोली पोलीस दल आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाने (CRPF) संयुक्त कारवाई करत भामरागड परिसरात घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने 'रेकी' (गुप्त माहिती गोळा करणे) करणाऱ्या एका कट्टर नक्षल समर्थकाला अटक केली आहे. सैनु ऊर्फ सन्नु अमलु मट्टामी (वय ३८, रा. पोयारकोठी, ता. भामरागड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या अटकेमुळे गडचिरोली पोलिसांच्या माओवादविरोधी अभियानाला मोठे यश मिळाले आहे,