सूर्यदेवाची उपासना आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी केली जाणारी पवित्र छठ पूजा जळगाव शहरात मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाली. उत्तर भारतीय संघ छठ पूजा समितीच्या वतीने सोमवारी २७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता शहरातील मेहरुण तलाव येथे या सामूहिक छटपूजेचे आयोजन करण्यात आले होते.