जालना: जालना महानगरपालिकेत एसीबीच्या सहा कारवाया; अतिक्रमण प्रमुख श्यामसुंदर कसबे तिसऱ्यांदा जाळ्यात
Jalna, Jalna | May 28, 2026 जालना महानगरपालिकेत भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाने (एसीबी) आतापर्यंत सहा कारवाया केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे महानगरपालिकेतील अतिक्रमण विभाग प्रमुख श्यामसुंदर कसबे यांच्यावर आतापर्यंत तीन वेळा एसीबीची कारवाई झाल्याने शहरात मोठी चर्चा सुरू झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मामा चौक ते कोलू तेलखाना परिसरातील नाली साफसफाईच्या कामासाठी ५० हजार रुपयांची लाच मागण्यात आली होती. त्यापैकी ४० हजार रुपये बाकी असल्याने श्यामसुंदर कसबे हे तक्रारदाराला वारंवार फोन करून पैशांच