वाशिम: जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त पोस्टर स्पर्धेतून एनसीसी विद्यार्थ्यांनी केली जनजागृती
Washim, Washim | Oct 14, 2025 जागतिक मानसिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून मंगळवार, १४ ऑक्टोंबर रोजी जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम व जिल्हा रुग्णालयाच्या वतीने स्थानिक श्री बाकलीवाल विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी मानसिक आरोग्य जनजागृती आणि पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. एनसीसी अधिकारी अमोल काळे यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.