अंबरनाथ: अंबरनाथ नगरपालिकेच्या शाळेच्या आवारात अचानक आढळला साप, विद्यार्थ्यांची उडाली तारांबळ
अंबरनाथ नगरपालिकेच्या शाळेच्या आवारामध्ये अचानक साप आढळून आला. शाळेच्या आवारातून साप आहे अशी बातमी शाळेत पसरल्यानंतर विद्यार्थ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. त्यानंतर सर्पमित्रांना बोलवण्यात आले आणि सर्पमित्रांनी सापाला रेस्क्यू केले त्यानंतर शिक्षक विद्यार्थ्यांनी नि:श्वास सोडला. मात्र शाळेच्या आवारात साप आढळल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.