आज दि 4 डिसेंबर संध्याकाळी 5 वाजता पाचोड येथील एसबीआय बँकेच्या एटीएम बुथमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची धक्कादायक घटना आज सव्वा पाच वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे बसस्थानक परिसरात मोठी खळबळ उडाली होती. पैठण तालुक्यातील पाचोड येथे एसबीआय बँकेचे एटीएम पाचोड येथील बस स्थानकासमोर असणाऱ्या अन्नपूर्णा हॉटेल शेजारी आहे, या एटीएम मध्ये दररोज मोठ्या प्रमाणात गर्दी असते. गुरुवारी सायंकाळी पाच वाजेच्या एटीएम मधून अचानक धूर बाहेर येऊ लागला, यावेळी हॉटेलमध्ये आणि बस स्थानकामध्ये असणाऱ्या