नागपूर ग्रामीण: पारदर्शक आणि गतिमान प्रशासनासाठी आम्ही कटिबद्ध - पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे
"पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र प्रगतीचे नवनवीन टप्पे गाठत आहे. विकासाच्या प्रक्रियेत कोणताही घटक वंचित राहू नये यासाठी शासन कटिबद्ध असून, जनतेला पारदर्शक, जबाबदार आणि गतिमान प्रशासनाची अनुभूती देऊ," असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. महाराष्ट्र राज्य स्थापना दिनानिमित्त नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभात ते बोलत होते.