खटाव: औंध संस्थानच्या अधिपती श्रीमंत गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांनी तलवार उंचावत हर हर महादेवचा केला जयघोष
Khatav, Satara | Oct 12, 2025 औंध संस्थानच्या अधिपती श्रीमंत गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांनी तलवार उंचावत हर हर महादेवचा जयघोष केला. त्यांच्या या भूमिकेची संपूर्ण जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रात चर्चा सुरू झाली आहे. औंध येथे शनिवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत औंध शिक्षण मंडळाच्या श्रीमंत हर्षिताराजे इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या नवीन इमारतीचा लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. मंडळाच्या वतीने श्रीमंत गायत्री देवी पंतप्रतिनिधी यांचा तलवार देऊन सन्मानित करण्यात आला.