बाळापूर: आई तुळजाभवानी ची प्रचिती पारस गावामध्ये भाविक भक्तांच्या कडून दर्शनासाठी अलोट गर्दी.
Balapur, Akola | Sep 29, 2025 राज्यातील साडेतीन शक्तिपीठापैकी एक पूर्ण पीठ म्हणून तुळजाभवानी देवी ही महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून ओळखली जाते. याच आई तुळजाभवानी देवीचं अतिशय सुंदर मंदिर अकोल्यातील पारस गावात साकारण्यात आलय. सध्या नवरात्र महोत्सव सुरू असून भाविकांनी दर्शनासाठी पारसच्या या तुळजाभवानी मंदिरात मोठी गर्दी केली आहे. राज्यात सध्या सर्वत्र नवरात्र उत्सवाची धूम पाहायला मिळत आहे. हा उत्सव नऊ रात्री देवी दुर्गा आणि तिच्या नऊ रूपांच्या पूजेसाठी समर्पित आहे.