उल्हासनगर: उल्हासनगर मधील तीन वर्षाच्या चिमुकलेला शिक्षिकेने केलेल्या मारहाण प्रकरणी मनसे आक्रमक, प्ले ग्रुप ची केली तोडफोड
दोन दिवसापासून उल्हासनगर येथून एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत होता. उल्हासनगर कॅम्प क्रमांक 4 येथील एका प्ले ग्रुप मधील तीन वर्षाच्या चिमुकल्याला इंग्रजी कविता म्हणत असताना टाळ्या वाजवता आल्या नाहीत म्हणून शिक्षिकेने त्याच्या गालामध्ये फटके दिल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येत होते. या व्हायरल व्हिडिओ नंतर पालकांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली मात्र व्हिडिओ व्हायरल होत असतील सदरची शिक्षिका फरार झाली आहे. याप्रकरणी मनसेने आक्रमक होत प्ले ग्रुपची तोडफोड करून चालकाला जाब विचारला.