पनवेल महानगरपालिकेच्या मुख्यालयात आज बुधवार दिनांक 19.11.2025 रोजी भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंती निमित्ताने आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच राष्ट्रीय एकात्मता दिनानिमित्ताने राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेण्यात आली. यावेळी अतिरीक्त आयुक्त गणेश शेटे, अतिरीक्त आयुक्त महेशकुमार मेघमाळे, परिवहन व्यवस्थापक कैलास गावडे, उपायुक्त डॉ. वैभव विधाते, उपायुक्त मंगला माळवे, उपायुक्त आयुक्त स्वरूप खारगे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मंगेश गावडे, मुख्य लेखा परिक्षक निलेश नलावडे, लेखा अधिकारी संग्राम ऱ्होरकाटे, पशुवैद्यकिय अधिकारी डॉ. भगवान गीते, सामान्य प्रशासन किर्ती महाजन, महापालिका अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.