भावी पत्नीसोबत प्रेमप्रकरण असल्याचा संशयावरून एका तरूणाचा चाकूने भोसकून खून केल्याची धक्कादायक घटना शनिवारी २२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता मुक्ताईनगर येथील आर.आर. कॉलनीजवळील गार्डन येथे घडली. याप्रकरणी दोन भावांना अटक करण्यात आली असून त्यांच्या विरोधात रविवारी २३ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री १२.३० वाजता मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आली असून सोमवारी २४ नोव्हेंबर रोजी पहाटे ५ वाजता आरोपींना अटक करण्यात आली.