एकदाच वापराच्या प्लास्टिक वस्तूंवर बंदी असतानाही शहर व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर साठवणूक, विक्री, वाहतूक आणि वापर सुरू आहे. त्यामुळे व्यापक जनजागृतीबरोबरच साठवणूकदार आणि विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिल्या. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा पर्यावरण समितीची बैठक पार पडली.