शिरूर कासार: शिरूर कासार तालुक्यात रात्री उशिरापर्यंत मंत्री पंकजा मुंडे यांनी नुकसानीची पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला
शिरूर कासार तालुक्यातील पूरग्रस्त भागाचा दौरा करून शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेण्यासाठी राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे रात्री उशिरापर्यंत थांबल्या. तालुक्यातील अनेक गावे पूरामुळे जलमय झाली असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामध्ये शेतीमाल, घरगुती साहित्य तसेच जनावरांच्या गोठ्यांचेही नुकसान झाल्याचे चित्र दिसून आले. मंत्री मुंडे यांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. शेतकरी बांधवांनी पिकांचे झालेले नुकसान, जनावरांना चारा-पाणी समस्या निर्माण झ