सातारा: गोडोली येथील अण्णा चायनिज सेंटरमध्ये आग, अग्निशामक दलाकडून नियंत्रण
Satara, Satara | Oct 18, 2025 दि. १८ ऑक्टोबर रोजी सकाळी ६.३५ वाजता गोडोली येथील साई बाबा मंदिराच्या समोर असलेल्या अण्णा चायनिज सेंटर येथे गॅस सिलिंडर लिक झाल्याने अचानक आग लागली. सुदैवाने अग्निशामक दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला. आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे फायरमन सागर जाधव, वाहन चालक तेजस जाधव, फायरमन शुभम यादव यांनी घटनास्थळी धाव घेवून तातडीने कुलिंगची प्रक्रिया करुन गॅस टाकी सुरक्षीतपणे बाहेर काढली.