नागपूर ग्रामीण: बैलवाडा येथील रिठी हनुमान मंदिरात भरदिवसा चोरी; भाविकांमध्ये संताप
बैलवाडा येथील ब्राह्मणवाडा रोडवर असलेल्या प्राचीन व जागृत 'रिठी हनुमान मंदिर' येथे चोरट्यांनी भरदिवसा डल्ला मारला. चोरट्यांनी मंदिरात प्रवेश करून देवाचे चांदीचे डोळे आणि मंदिरातील मोठी पितळी घंटी चोरून नेली. या घटनेमुळे स्थानिक भाविकांच्या भावना दुखावल्या असून परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे