कर्जत: कर्जतमधील विविध बूथ केंद्रांना आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देत मतदारांशी साधला संवाद
Karjat, Raigad | Dec 2, 2025 रायगड जिल्ह्यातील कर्जत नगरपरिषदेच्या निवडणुकीत आज मतदानाचा पहिला तास सुरू होताच मतदारांनी मोठ्या उत्साहात मतदान केंद्रांकडे धाव घेतली. सकाळपासूनच अनेक बुथवर रांगा दिसत असून भाजप–शिवसेना महायुतीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार स्वाती लाड यांना मिळणारा जनसमर्थनाचा ओघ विशेषत्वाने लक्षणीय ठरत आहे. मतदानाचा आढावा घेण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे रायगड जिल्हा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर आणि जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी कर्जतमधील महायुतीच्या विविध बूथना भेट दिली. या दौऱ्यात त्यांनी स्थानिक कार्यकर्ते, बूथ प्रमुख आणि नागरिकांशी संवाद साधत मतदानाची परिस्थिती जाणून घेतली.