अमरावती: यंग मार्वल सर्विसेस एलएलपी व महानगरपालिकेतर्फे अमरावतीत प्लास्टिकबंदी जनजागृती मोहीम
यंग मार्वल सर्विसेस एलएलपीच्या पुढाकाराने आणि अमरावती महानगरपालिकेच्या सहकार्याने आज शहरातील प्रमुख ठिकाणी “प्लास्टिकबंदी जनजागृती मोहीम” राबविण्यात आली. एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या वाढत्या वापरामुळे पर्यावरण आणि आरोग्यावर होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी नागरिकांमध्ये थेट संवाद साधून जागरूकता निर्माण करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश होता. यंग मार्वल सर्विसेस एलएलपीचे सदस्य, महानगरपालिका अधिकारी आणि स्थानिक स्वयंसेवकांनी दुकानदार, फेरीवाले, ग्राहक तसेच नागरिकांशी संवाद साधला. त्