फलटण: लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर नगरपालिका निवडणुकीचे निकाल २० डिसेंबरनंतर जाहीर करा; आ. श्रीमंत रामराजे
Phaltan, Satara | Nov 30, 2025 सातारा जिल्ह्यातील फलटण आणि महाबळेश्वर नगरपालिका निवडणुकांपुढे प्रशासकीय अडचणी उभ्या राहिल्यानंतर विधानपरिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी नावीन्यपूर्ण तोडगा सुचवला आहे. लोकसभा–विधानसभा निवडणुकीप्रमाणे मतदान त्वरित घेऊन, मात्र निकाल एकत्रितपणे जाहीर करण्याची पद्धत नगरपालिकांसाठीही राबवावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याची तयारी पूर्ण झाली असून शिवसेनेच्या उमेदवारांनी त्या याचिकेवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.