कोपरगाव: बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराचा निषेध करण्यासाठी २९ डिसेंबरला शिर्डीत आंदोलन, महंत रामगिरी महाराज
बांगलादेशातील हिंदू समाजावर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ शिर्डी येथे २९ डिसेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौकात निषेध आंदोलन आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती सराला बेटाचे मठाधिपती महंत रामगिरी महाराज यांनी २८ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता दिली.या आंदोलनात विविध सामाजिक व धार्मिक संघटनांचा सहभाग अपेक्षित असून नागरिकांना शांततेत मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.