जलजीवन मिशन योजनेंतर्गत केलेल्या कामाचे थकीत बिल अदा केले जात नसल्याच्या कारणावरून संतप्त झालेल्या एका ठेकेदाराने जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कार्यालयात कडी लावून कोंडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा प्रकार शुक्रवारी ५ नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजता जिल्हा परिषदेच्या आवारात घडला. यासंदर्भात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.