19 नोव्हेंबर हा दिवस संपूर्ण जगभरात संयुक्त राष्ट्र संघाने घोषित केल्याप्रमाणे जागतिक शौचालय दिन म्हणून साजरा करण्यात येतो. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने या दिवसाचे औचित्य साधून महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका क्षेत्रातील सर्व 405 सार्वजनिक व सामुदायिक शौचालयामध्ये विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. त्याचप्रमाणे शौचालयाची दैनंदिन स्वच्छता करणा-या 560 सफाईमित्रांचा कॅप आणि गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला. अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांच्या नियंत्रणाखाली आयोजित या स्वच्छता आणि सन्मान उपक्रमात घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. अजय गडदे हे आकांक्षी शौचालय, कोपरखैरणे येथे स्वच्छता मोहीमेत स्वत: सहभागी झाले होते.