अकोला मनपा धार्मिक स्थळे, शाळा, दुकाने, रुग्णालयांकडून शासनाच्या 1 जुलै 2019 च्या परीपत्रकातील दरांपेक्षा जास्त कचरा शुल्क वसूल करत असल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडीचे निलेश देव यांनी दिनांक 24 नोव्हेंबर रोजी दुपारी 5 वाजता मनपा आयुक्तांना निवेदन दिले. शासन दर 60 ते 120 असूनही अकोल्यात 150 ते 400 रुपये आकारले जात असल्याचे त्यांनी नमूद केले. ‘दुहेरी कर’ व लंपसम वसुली नियमबाह्य असल्याचा आरोप करत त्यांनी शासन दर लागू करण्याची मागणी केली.