तिरोडा: विज पडून शेतकरी महिलेचा मृत्यू सोनेखारी येथील घटना
Tirora, Gondia | Sep 14, 2025 गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील सोनेखरी गावातून एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. शेतात काम करत असताना अचानक आलेल्या जोरदार वादळी पावसादरम्यान वीज अंगावर कोसळल्याने एका 62 वर्षीय शेतकरी महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना दिनांक 13 सप्टेंबरला दुपारच्या दरम्यान घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण सोनेखरी गावात शोककळा पसरली आहे.मृतक महिलेचे नाव लक्ष्मीबाई तुळसीदास ईळपाते (वय 62) असे आहे. नेहमीप्रमाणे त्या शेतात कामासाठी गेल्या होत्या. दरम्यान ही घटना घडली.