वरोरा: आनंदवन चौक येथे चारचाकी वाहनाने अचानक पेट घेतला;सुदैवाने जीवित हानी टळली
चंद्रपूर नागपूर महामार्गावर आज दि.१९ सप्टेंबर ला दुपारी २.३० वाजताच्या सुमारास आनंदवन चौक येथे चारचाकी वाहनाने अचानक पेट घेतला, काही क्षणात वाहन जाळून राख झाले. सुदैवाने या घटनेत कसलीही जीवितहानी झाली नाही.नागपूर निवासी अमीन हारून अली हाजी हे आपल्या दोन सहकाऱ्यांसह चंद्रपूर वरून नागपूरला अलक्झर वाहन क्रमांक mh ३१ fu ६६७३ ने निघाले होते, वरोरा मधील आनंदवन चौकात पोहोचल्यावर अचानक वाहनातून धूर निघू लागला.