दिग्रस शहरातील प्रभाग क्र. ६ (जुना नगर परिषद मागील परिसर) येथे अनेक ठिकाणच्या नाल्या तुडुंब भरल्याने परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे. मागील अनेक दिवसांपासून नाल्यांची नियमित साफसफाई न झाल्यामुळे साचलेले घाण पाणी आणि कचरा यामुळे दुर्गंधी पसरली असून रोगराई पसरण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. या गंभीर स्थितीकडे नगर पालिका आरोग्य विभागासह नवनिर्वाचित लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.