धुळे: धुळ्याची चिंता वाढली! मंकीपॉक्स रुग्णाचा सहावा रिपोर्टही पॉझिटिव्ह; आरोग्य यंत्रणेसमोरील आव्हान कायम
Dhule, Dhule | Nov 8, 2025 धुळे शहरात चिंतेची बाब समोर आली आहे. सौदी अरेबियातून परतलेल्या 44 वर्षीय व्यक्तीला मंकीपॉक्सची लागण झाली असून, हिरे वैद्यकीय महाविद्यालयात गेल्या महिन्यापासून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र सहावा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. वारंवार पॉझिटिव्ह अहवालांमुळे आरोग्य यंत्रणेसमोर आव्हान निर्माण झाले असून, डॉक्टर रुग्णाच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत. पुढील तपासणीसाठी नमुने पुन्हा पुणे येथे पाठवले जाणार आहेत.