अक्कलकुवा: वेहगी गावातील गर्भवती महिलेला रस्ताअभावी रुग्णालयापर्यंत बांबूच्या झोळीचा आसरा.....
नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम भागात आजही आदिवासी बांधवांना मरत यातना सहन करावा लागत आहे. वेहगी गावातील गर्भवती महिला अनिता वसावे यांना दुपारी प्रसूती वेदना जाणू लागल्या. रस्ताअभावी रुग्णालयापर्यंत घेऊन जाण्यासाठी ग्रामस्थांनी बांबूच्या झुळीचा आसरा घेतला. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार महिलेची रस्त्यातच प्रसूती झाली आहे. पिंपळखुटा ग्रामीण रुग्णालयात माता आणि बालक दोघेही सुखरूप आहेत.