कळंब: डोंगरखर्डा शिवारात पोलिसांचा जुगारावर छापा सात जुगारी ताब्यात 15 लाख 65 हजार 670 रुपयांचा मुद्देमाल जप्त
कळंब पोलीस स्टेशनच्या हद्दीतील डोंगरखर्डा शिवारा सुरू असलेल्या पत्त्याच्या जुगारावर स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकला या कारवाईत पोलिसांनी जुगार खेळणाऱ्या सात जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून रोख रक्कम जुगाराचे साहित्य आणि एक इनोवा गाडी असा एकूण पंधरा लाख 65 हजार 670 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई पोलिसांनी 14 सप्टेंबर रोजी रात्री केली.