वर्षाच्या शेवटच्या शनिवारचे औचित्य साधून भंडारा शहरातील मोठा बाजार येथील ऐतिहासिक हनुमान मंदिरात भक्तीमय वातावरणात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भंडारा नगरपरिषदेच्या नवनियुक्त नगराध्यक्ष मधुरा मदनकर यांनी दिनांक 27 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता दरम्यान प्रभू हनुमानाची विधीवत महाआरती करून दर्शन घेतले व शहराच्या समृद्धीसाठी प्रार्थना केली. याप्रसंगी भाविकांसाठी भव्य महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आले होते. मंदिर समिती व मंडळाच्या वतीने नगराध्यक्ष मधुरा मदनक