धुळे जिल्ह्यातील धरणांमध्ये 37% जलसाठा जामखेडी धरण पूर्ण क्षमतेने भरले
Dhule, Dhule | Jul 6, 2026 धुळे जिल्ह्यातील धरणांमध्ये 37 टक्के पाणीसाठा; पांझरा धरणात 64 टक्के जलसाठा धुळे दि. 4 धुळे जिल्ह्यातील एकूण जलसाठ्यामध्ये सध्या 37 टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी याच दिवशी जिल्ह्यात 41 टक्के पाणीसाठा उपलब्ध होता, म्हणजेच गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा पाणीसाठा काहीसा कमी आहे. धुळे जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांचा विचार केला तर, सध्या या प्रकल्पांमध्ये 35.25 टक्के उपयुक्त जलसाठा आहे. पांझरा धरणात सध्या 64 टक्के इतका समाधानकारक पाणीसाठा असून, त्यात 6.46 दलघमी उपयुक्त साठा उपलब्ध आहे. जामखेडी धरणामध्ये सध्या 100 टक्के म्हणजेच पूर्ण क्षमतेने पाणी भरले असून, त्यात 5.08 दलघमी उपयुक्त साठा आहे. अक्कलपाडा धरणात सध्या 39 टक्के उपयुक्त जलसाठा असून, तो 14.63 दलघमी इतका आहे.