परभणीमध्ये नुकत्याच १० नवीन इलेक्ट्रिक वातानुकूलित 'शिवाई' बसेस दाखल झाल्या. ह्या बसेस परभणी शहरातील वसमत रोड वरून धावताना दिसून आल्या. या बसेसमुळे प्रवाशांना आधुनिक आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळणार आहे, आणि या बसेस आता शहरातील रस्त्यांवर धावण्यासाठी सज्ज आहेत, ज्यामुळे परभणीच्या परिवहन सेवेत मोठी सुधारणा होत आहे. इलेक्ट्रिक 'शिवाई' बसेस परभणी आगारामध्ये दाखल झाल्या आहेत. ह्या बस मुळे प्रदूषण कमी होण्यास मदत होईल.