चिखलदरा: खारी फाट्याजवळील पुलाखाली सापडलेल्या अज्ञात मृत महिलेची ओळख पटली;महिला मध्यप्रदेश राज्यातील रहिवाशी
चिखलदरा तालुक्यातील खारी फाट्याजवळील पुलाखाली दिनांक १९ रोजी अज्ञात महिलेचा मृतदेह पाण्यात आढळून आला. सदर महिलेचा मृत्यू झाला की तिची हत्या झाली याचा तपास चिखलदरा पोलीस करत असून महिलेची ओळख पटविण्याचे आवाहन करण्यात आले होते.आज दुपारी त्या मृत महिलेची ओळख पटली असून ती महिला मध्यप्रदेश राज्यातील चांदु पलशिया येथील रहिवासी असल्याची माहिती आज सायं ६ वाजता पोलीस विभागाकडून मिळाली.