निफाड: निफाड तालुक्यात आशा वर्करवर लैंगिक छळ – आरोपीवर तत्काळ कारवाईची मागणी
Niphad, Nashik | Oct 20, 2025 दि. 18 ऑक्टोबर 2025 रोजी कानळद (ता. निफाड) येथील आशा वर्कर यांच्यावर 102 अॅम्बुलन्स चालकाकडून झालेल्या लैंगिक छळप्रकरणी तीव्र संताप व्यक्त होत आहे. या घटनेविरोधात महाराष्ट्र राज्य आशा–गटप्रवर्तक कर्मचारी कृती समिती आणि आयटक यांच्या वतीने निफाड पोलिस स्टेशनला निवेदन देण्यात आले.