नांदेड: जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील कॅन्टीन मधील खिचडीत आढळून आले झुरळ, अन्न भेसळ प्रशासनाकडून करण्यात आली चौकशी
Nanded, Nanded | Oct 31, 2025 जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील महसूल कर्मचारी संघटनेच्या मार्फत चालणाऱ्या कॅन्टीनमध्ये एक व्यक्ती खिचडी मागवली असता सदरील खिचडीत झुरळ निघाला होता. सदर खिचडीत झुरळ स्पष्टपणे दिसत असल्याच्या फोटो आजरोजी दुपारी 3:45 च्या सुमारास व्हायरल होताना दिसत आहे.हे झुरळ निघण्याचा प्रकार एखाद्याच्या जीवनाशी खेळण्याचा प्रकार असल्याचे बोलले जात असून सदर सदर प्रकरणाची माहिती अन्न व भेसळ प्रशासनास देण्यात आल्या असून ते त्या ठिकाणी येऊन आता योग्य ती चौकशी केले आहेत.