रामटेक तालुक्यातील आदिवासीबहुल देवलापार नजीकच्या लाखापूर शेत शिवारात बुधवार दि. 25 फेब्रुवारीला सकाळी एका वाघाने झडप घालून शेतात चरत असलेल्या एका मोठ्या नीलगाईला ठार केल्याची घटना घडली आहे. एका शेतात ही घटना घडल्याने वाघ नजीकच दबा धरून बसला असल्याची शक्यता आहे. यामुळे या परिसरातील शेतकरी, नागरिकात प्रचंड दहशत आहे ही घटना पवनी प्रादेशिक वनपरिक्षेत्रांतर्गत घडली. वन विभागाला याची सूचना देण्यात आली असून पंचनामा करण्यात आला आहे.