जालना: जालना शहरातील इंदिरानगर भागात अतिक्रमणावर कारवाई; पोलीस बंदोबस्तात पाडण्यात आली अतिक्रमणे
Jalna, Jalna | Oct 9, 2025 जालना शहरातील इंदिरानगर भागात गुरुवार दि. 9 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास महानगरपालिकेकडून अतिक्रमणविरोधी कारवाई करण्यात आली. सार्वजनिक रस्ते आणि नाले यांच्या कडेला करण्यात आलेल्या अतिक्रमणांमुळे नागरिकांना होणारा त्रास तसेच वाहतुकीतील अडथळा लक्षात घेऊन ही कारवाई करण्यात आली. मनपा प्रशासनाने पूर्वसूचना देऊनही काही व्यावसायिक व नागरिकांनी बेकायदेशीरपणे बांधकामे उभी केली होती. त्यानंतर आजपासून मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने पोलीस बंदोबस्तात कारवाई सुरू केली.