22 ऑक्टोबरला सायंकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार पोलीस ठाणे बजाज नगर हद्दीतील शंकर नगर येथे 35 वर्षीय अज्ञात व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत मिळून आले होते. त्यांना उपचाराकरिता मेडिकल हॉस्पिटल येथे दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला या प्रकरणी प्राप्त सूचनेवरून पोलीस स्टेशन बजाज नगर येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे